बेळगावात भीषण अपघातात 6 ठार

बेळगाव: थांबलेल्या उसाच्या ट्रकला पाठीमागून मोटारीची धडक बसली. गोकाक तालुक्‍यातील हिरे नंदीजवळ हा अपघात घडला या अपघातामध्ये सहा महिला जागीच ठार झाल्या तर दहा जण जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व मृत सौंदत्ती तालुक्‍यातील माडमगेरी व यरझरवी येथील रहिवासी आहेत. गोकाक येथील नात्यातील एका व्यक्तिचा अंत्यविधी उरकून परतत असताना हा अपघात घडला.

गंगव्वा हुरळी (वय 30), काशवा खंडरी (70), यल्लव्वा पुजारी (45), यल्लव्वा गुंडाप्पानवर (40), रेणुका सोपडला (34) व मल्लव्वा खंडरी (50) अशी मृतांची नावे आहेत. मोटारीतील चार महिला जागीच ठार झाल्या. उर्वरित दोघींचा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जखमींवर उपचार सुरू आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)