अर्जुन मलायकाच्या नात्याला बहिण अंशुलाकडून “ग्रीन सिग्नल’

अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या अफेअरवर सगळ्या बॉलिवूडमध्ये चर्चा सुरु आहे. अर्जुन आणि मलायका एकमेकांच्या कुटुंबांच्याही जवळ यायला लागले आहेत. अलिकडेच अर्जुन आणि त्याची बहिण अंशुला एका चॅट शो मध्ये एकत्र सहभागी झाले होते. तिथे अंशुलाला अर्जुनच्या गर्लफ्रेंडबाबत विचारले गेले. “अर्जुनची कोणती एक्‍स गर्लफ्रेंड सर्वात जास्त आवडते.’ असे तिला विचारले गेले होते. त्यावर अर्जुनच्या सगळ्याच गर्लफ्रेंड आपल्याला आवडतात. त्याच्या सगळ्याच गर्लफ्रेंडची आणि आपली चांगली मैत्री असल्याचे तिने सांगितले.

तिच्या या उत्तरामुळे मलायकाबाबत तिने ग्रीन सिग्नल दिल्याचेच स्पष्ट होते. अर्जुन कपूरची पहिली गर्लफ्रेंड ही सलमान खानची बहिण अर्पिता होती. अर्जुनने एका इंटरव्ह्यूमध्ये अर्पिताबाबत सांगितलेही होते. “मैने प्यार क्‍यों किया’च्या शुटिंगच्यावेळी अर्पिताची आणि आपली ओळख झाली होती आणि नंतर आपण डेट करत होतो, असेही त्याने सांगितले. मात्र नंतर हे रिलेशन मागे पडले आणि अर्जुनच्या आयुष्यात मलायकाचा प्रवेश झाला. मलायका ही सलमानची पूर्वाश्रमीची वहिनी आहे. पण आता या नात्याला अर्जुनच्या बहिणीने तरी स्वीकारले असल्याचे दिसते आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)