पर्याय सिंकचे

घर बांधताना किचनचा ओटा, त्यावरील टाईल्स, बाथरुम… वगैरेची माहिती असणे आवश्‍यक असते. काही दिवसांपूर्वी स्टीलचं सिंक ही किचनच्या अत्याधुनिकतेची परिसीमा होती. पण आज परिस्थिती तशी राहिली नाही. आज बाजारात या सिंकचेही इतके पर्याय उपलब्ध आहेत की निवड करताना आपल्यालाच गोंधळून जायला होतं.

स्टेनलेस स्टीलचे सिंक म्हणजे पूर्वापारच्या कडाप्पाच्या सिंकला एक उत्तम पर्याय होते. पण काही वर्षातच त्यावर ओरखडे पडायचे. त्याची चमक कमी व्हायची व काहीवेळा हे सिंक जुनाट दिसू लागते.अनेकांचा पुन्हा नैसर्गिक मटेरियल्सकडून ओढा दिसू लागला. स्क्रॅचप्रुफ, चमक कधीही न कमी होणारे हे सिंक किचनच्या लुकमध्ये अडसर न वाटता त्याचा एक भागच वाटतात. सोपस्टोन, कॉम्पोझिट स्टोन, फायरक्‍ले अशा नैसर्गिक मटेरियल्सपासून बनलेल्या अशाच काही आधुनिक सिंकची माहिती.

ग्रॅनाईट सिंक : रंगाचं वैविध्य, डाग, ओरखडे नाहीत, सच्छिद्र नाही व याची चमकही लवकर कमी होत नाही, हे याचं वैशिष्ट्य. ग्रॅनाईट बऱ्याच प्रमाणात उष्णता सहन करू शकते, त्यामुळे स्वयंपाकघरात याचा फायदाच होतो. यामध्ये मेटॅलिक रंगांना जास्त मागणी असते.

तांब्याचं सिंक : आपल्याला जर घराच्या इतर भागांप्रमाणेच किचनमध्येही क्‍लासिक लुक हवा असेल तर याला पर्यायनाही. तांब्याची थोडी निगा राखावी लागते. हे मानले तरी याची सर इतर कशालाच येणार नाही. ठोकून ठोकून बनवलेलं हे तांब्याचं सिंक म्हणजे किचनमधील हायलाईट ठरू शकतं. शिवाय हे आपल्याला हव्या त्या आकारात बनवून मिळतं.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)