भरारी घेण्यास सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज : मुख्यमंत्री

सिंधुदुर्ग विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचा उद्‌घाटन सोहळा

सिंधुदुर्ग – गेल्या चार वर्षांच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 71 हजारांवरुन एक लाख 4 0 हजारांपर्यंत गेले आहे. महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, पर्यटन, हवाई सेवा या माध्यमातून विकासाची मोठी भरारी घ्यायला सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. सिंधुदुर्ग विमानतळाच्या (चिपी) टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

आज सकाळी शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उद्योग, वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार नारायण राणे, खासदार विनायक राऊत, विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, बाळाराम पाटील, आमदार वैभव नाईक, नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. एन. वासुदेवन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या उद्घाटन सोहळ्याबरोबरच चांदा ते बांदा अंतर्गत लाभार्थींना प्रमाणपत्र वितरण तसेच विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा तसेच विकास कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

जिल्ह्यातून जाणारा रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग यामुळे विकासाचा वेग वाढतो. तथापी जिल्ह्यात अद्ययावत विमानतळाद्वारे प्रवासी व माल वाहतुकीची विमान सेवा सुरू झाली तर विकासाचा वेग तिप्पट होतो असे स्पष्ट करुन मुख्यमंत्री म्हणाले की, चिपी विमानतळाच्या परवानग्या मिळविण्यासाठी अनेक अडचणी होत्या. पण, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी विशेष परिश्रम घेऊन या विमानतळाच्या परवानग्यांचा मार्ग सुकर केला. त्याबाबत ते अभिनंदनास पात्र आहेत. चिपी विमानतळ हा पर्यायी विमानतळ म्हणूनही उत्तमप्रकारे काम करु शकेलअसे ते म्हणाले.

आज एअरपोर्ट सथॉरेटी ऑफ इंडिया व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या विमानतळाबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विमानतळासही आता चालना मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. हा समारंभ संपन्न झाल्यावर गुजरात राज्यातील वस्त्राल येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते असंघटीत कामगारांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या श्रमयोगी मानधन योजनेचा शुभारंभ प्रसंगी त्यांनी केलेल्या भाषणाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रम स्थळी मोठ्या पडद्यावर करण्यात आले. या भाषणाचा उपस्थित मान्यवर व नागरिकांनी लाभ घेतला. या समारंभास माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, अजित गोगटे, पुष्पसेन सावंत यांच्यासह अतुल काळसेकर, संदेश पारकर, मानव साधन विकास संस्थेच्या उमा प्रभू, दिपाली म्हैसकर, सुधाताई म्हैसकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम तसेच चिपी व परुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ बंधु भगिनी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)