आशियाई स्पर्धेबाबत सिंधू आशावादी

अपुऱ्या तयारीनंतरही सरस कामगिरीची अपेक्षा
हैदराबाद: अत्यंत व्यस्त अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या वेळापत्रकामुळे आगामी आशियाई क्रीडास्पर्धेसाठी तयारी करण्यास भारतीय बॅडमिंटनपटूंना पुरेसा वेळ मिळेला नसल्याचे जागतिक रौप्यविजेत्या पी. व्ही. सिंधूने स्पष्ट केले. मात्र तयारीसाठी अपुरा वेळ मिळाला असला, तरी गेल्या वेळेपेक्षा यंदाच्या स्पर्धेत सरस कामगिरी करण्याचा विश्‍वासही तिने व्यक्‍त केला आहे. तसेच गेल्या 36 वर्षांत हुलकावणी देणारे वैयक्‍तिक पदकही देशाला मिळवून देण्यासाठी सज्ज असल्याचे सिंधूने म्हटले आहे.
चार वर्षांपूर्वी झालेल्या गेल्या 2014 आशियाई क्रीडास्पर्धेत भारतीय महिला संघाने कांस्यपदक पटकावले होते. त्या स्पर्धेतील भारतीय बॅडमिंटनपटूंची ती सर्वोत्तम कामगिरी होती. येत्या 18 ऑगस्टपासून जकार्ता येथे सुरू होत असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत मात्र भारतीय खेळाडू चांगली कामगिरी बजावतील, असे सिंधूने म्हटले आहे. गेल्या वेळीही आम्हाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता. परंतु या वेळची परिस्थिती वेगळी आहे, असे सांगून सिंधू म्हणाली की, यंदाच्या स्पर्धेत सांघिक आणि वैयक्‍तिक पदकेही पणाला लागणार आहेत.
भारताच्या महिला व पुरुष संघात गेल्या वेळेपेक्षा अधिक दर्जेदार आणि सरस खेळाडूंचा समावेश आहे. तसेच या खेळाडूंनी गेल्या दोन-तीन वर्षांत आंतरराष्ट्रीय सतरावर चमकदार कामगिरी केली आहे, असे सांगून सिंधू म्हणाली की, जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक माझाही आत्मविश्‍वास उंचावणारे आहे. त्यामुळे आशियाई क्रीडास्पर्धेतील वैयक्‍तिक पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणता येईल असा मला विश्‍वास वाटतो. आठ वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावणाऱ्या सईद मोदीने 1982 दिल्ली आशियाई स्पर्धेत मिळविलेले कांस्यपदक हे आशियाई क्रीडास्पर्धेतील बॅडमिंटनमध्ये भारताचे एकमेव वैयक्‍तिक पदक आहे.
नानजिंग येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने रौप्यपदक जिंकले. तिला अंतिम फेरीत कॅरोलिना मेरिनकडून पराभव पत्करावा लागला. परंतु अंतिम फेरीपर्यंतच्या वाटचालीत सिंधूने नोझोमी ओकुहारा व आकाने यामागुची या अव्वल जपानी प्रतिस्पर्ध्यांना, तसेच कोरियाच्या संग जि हयुनला पराभूत करीत आश्‍चर्यकारक कामगिरी केली होती. जागतिक स्पर्धेत पहिल्या फेरीपासूनच खडतर प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागल्याचे सांगून सिंधू म्हणाली की, मला दुसऱ्यांदा अंतिम पेरीत पराभव पत्करावा लागला असला, तरी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याशिवाय मी थांबणार नाही.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)