सिंधूला भावला पुन्हा रुपेरी रंग, अशी कामगिरी करणारी पहिली महिला खेळाडू

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. ऑलंपिक सुवर्ण विजेत्या कॅरोलिना मरिनने ऑलंपिक रौप्य पदक विजेती सिंधूचा सरळ दोन सेटमध्ये २१-१९ आणि २१-१०असा पराभव केला.

पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंकडून आक्रमक खेळाचे प्रदर्शन झाले. एका वेळी दोन्ही खेळाडू १५-१५ अश्या सामान गुणांवर होत्या. नंतर १८-१८ बरोबरी झाली परंतु नंतर मरिनने खेळ उंचावत पहिला सेट २१-१९ असा जिंकला.
दुसर्या सेटमध्ये मरिनचा बोलबाला राहिला. प्रथम तिने ४-१ अशी आघाडी मिळवली आणि विरोधी खेळाडू सामन्यात डोके वर काढणार नाही असा पवित्रा घेत आक्रमक खेळ केला. १८-८ अशी आघाडी मजबूत करत तिने सेंटचा निर्णय तिच्याच बाजूने राहणार याकडे लक्ष दिले. मरिनने हा सेट २१-१० असा जिंकत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे सुवर्ण आपल्या नावे केले.
गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखील या स्पर्धेत सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर तीन मोठ्या स्पर्धांमध्ये रोप्य पदक मिळवणारी पीव्ही सिंधू पहिली महिला ठरली आहे तर पुरुषांमध्ये अशी कामगिरी ली चँग वुई याने केलेली आहे.

 

-Ads-

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)