दलित असल्यानेच मुख्यमंत्रीपद नाकारले 

कर्नाटकात राजकीय वादळ ः कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. परमेश्वर यांचा आरोप

बंगळुरू – कर्नाटकात कॉंग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्रीपदी कुमारस्वामी विराजमान झाले. यामुळे भाजप सत्तेपासून दूर राहिला. पण कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद धुमसत राहिला आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. परमेश्वर यांच्या आरोपामुळे कर्नाटकमध्ये राजकीय वादळ निर्माण झाले असून कॉंग्रेस अडचणीत आली आहे.
दावणगिरी येथील कार्यक्रमात बोलताना परमेश्वर म्हणाले, मी दलित समाजातील असल्यामुळेच मला 3 वेळा मुख्यमंत्रिपदापासून रोखण्यात आले. तसेच पी. के. बसवलिंगप्पा आणि के. एच. रंगनाथ यांनाही मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली. मल्लिकार्जुन खर्गे हेही मुख्यमंत्री होऊ शकले नाही. पण कसंतरी करून मला आता उपमुख्यमंत्रिपद मिळाले आहे, असे खळबळजनक वक्‍तव्य त्यांनी केले.

फक्त राजकीय स्तरावरच नाही तर नोकऱ्यांमध्येही पदोन्नतीसाठी दलितांवर अन्याय होतो. आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पण त्याचा फारसा फरक पडलेला नाही. नोकरीत भेदभाव झाल्यामुळे काही अधिकाऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत. तसेच काही लोक राजकारणात मला दाबण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोपही त्यांनी केला.
मात्र, दुसरीकडे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी परमेश्वर यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. परमेश्वर यांनी कोणत्या आधारावर असे वक्तव्य केले आहे, याची माहिती नसल्याचेही ते म्हणाले. सिद्धरामय्या म्हणाले, कॉंग्रेसने दलित आणि इतर समाजातील वर्गाची नेहमीच काळजी घेतली आहे. मला माहीत नाही की, त्यांनी कोणत्या संदर्भात असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे हे तुम्हीच त्यांना विचारा, असा सल्लाही त्यांनी माध्यम प्रतिनिधींना दिला. दरम्यान, परमेश्वर हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. कुमारस्वामी हे पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील की नाही याची काहीही शाश्वती नाही, असे मत त्यांनी या अगोदर व्यक्त केले होते. त्यामुळे कॉंग्रेस आणि जेडीएसमध्ये वादही निर्माण झाला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)