विम्बल्डन – कारकिर्दीतील विक्रमी विजेतेपदासाठी सेरेना विल्यम्स या 37 वर्षीय खेळाडूला येथील विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत 27 वर्षीय खेळाडू सिमोना हॅलेपचे आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. हा सामना येथे आज होणार असून त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, सामन्यात सेरेना हिला पराभूत करण्यासाठी शेवटपर्यंत लढणार असं हॅलेपने म्हटले आहे.
पुढे बोलताना ती म्हणाली की, ग्रॅंड स्लॅमच्या अंतिम फेरीत सेरेनाचेच वर्चस्व असले तरीही मी आज तिला पराभूत करण्यासाठी शेवटपर्यंत लढणार आहे. माझ्यापेक्षा ती दहा वर्षांनी मोठी आहे. त्याचाच फायदा घेण्यावर माझा भर राहणार आहे. सेरेनाच्या खेळातही काही मर्यादा आहेत. मी त्याचा बारकाईने अभ्यास केला आहे. सुदैवाने आतापर्यंत माझा खेळ समाधानकारक झाला आहे. फोरहॅंडचे फटके व सर्व्हिसवर चांगले नियंत्रण ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे असे हॅलेपने सांगितले.