#भारत_वि_आॅस्ट्रेलिया_2018 : ऑस्ट्रेलियन माजी खेळाडूंमध्येच हमरीतुमरी

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्‍लार्क याने ऑस्ट्रेलियन संघाला भारता विरुद्धच्या कसोटी मालिकेत अन्य गोष्टींकडे लक्ष्य न देता आक्रमक खेळ करण्याचा सल्ला दिला होता.

ऑस्ट्रेलियन खेळाडू हे त्यांच्या मैदानावरील आक्रमक खेळासाठी ओळखले जातात. ते विरोधी खेळाडूला आक्रमक बोलून त्याची एकाग्रता भंग करण्यास भाग पडून सामन्याचे पारडे आपल्या बाजूला फिरवण्यात माहीर आहेत. चेंडू छेडछाड प्रकरणानंतर आपली डागाळलेली आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंमधील तो आक्रमकपणा कमी झाला आहे.

प्रतिमा सुधारण्यापेक्षा जर आक्रमक खेळ केला तर सामने जिंकाल अणे तुम्हाला आदर मिळेल. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही एक सामनाही जिंकू शकणार नाही, असे क्‍लार्क म्हणाला होता. या विधानांवरून नवीनच वाद निर्माण झाला आहे. त्यात अनेक ऑस्ट्रेलियन माजी खेळाडू क्‍लार्कवर टीका करत उडी घेत आहेत.

माजी खेळाडू सायमन कॅटीचने क्‍लार्क च्या विधानांवर टीका करत ऑस्ट्रेलियन क्रिकेट संस्कृतीवर परखड मत मांडले आहे.

कॅटीच म्हणाला, मागील अनेक वर्षांपासून अशाच प्रकारच्या आक्रमक आणि विरोधी खेळाडूंचा सन्मान न करण्याच्या वृत्तीमुळे ऑस्ट्रेलियाला क्रिकेट विश्वात नापसंत केले जाते. कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याच्या वृत्तीमुळे चेंडू छेडछाड प्रकरण घडले आणि ऑस्ट्रेलियाचे नाव जगभरात डागाळले आहे. ती प्रतिमा सुधारण्यासाठी सभ्यतेनेच खेळ करावा लागेल.

ऑस्ट्रेलियाचा संघ हा खेळाच्या विभागात अजूनही आक्रमक पद्धतीनेच खेळत आहे. परंतु, नियमांचे पालन करत सामना जिंकण्यासाठी कोणत्या स्तरापर्यंत जायचे याची सीमा आखली गेली पाहिजे. जेणेकरून पुन्हा चेंडू छेडछाड प्रकरणासारखी परिस्थिती ओढवणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)