आशियाई स्पर्धा : भारतीय महिला तिरंदाजी संघाने पटकाविले रौप्यपदक

जकार्ता –  इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०१८ स्पर्धांमध्ये आज दहाव्या दिवशी भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने रौप्यपदक जिंकल्यानंतर आज तिरंदाजीमध्ये सुध्दा भारतीय महिलांनी चांगली कामगिरी केली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या कम्पाऊंड सांघिक गटात भारतीय महिला तिरंदाजी संघाने रौप्यपदक पटकाविले आहे. अंतिम फेरीत भारतीय संघाचा कोरियाकडून 231-228 अशा फरकाने पराभव झाल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघात मुस्कान किरार, मधुमिता कुमारी आणि ज्योती सुरेशा वेन्नम यांचा समावेश होता.

-Ads-

भारताचे आशियाई स्पर्धा २०१८ मधील हे १४ वे रौप्यपदक ठरले. याआधी २०१४ मध्ये भारतीय महिलांना कम्पाऊंड गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)