साताऱ्यात विविध संघटनांची मूक फेरी

सातारा – काश्‍मीरमधील पुलवामा येथे आरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज शनिवारी सायंकाळी सातारा येथे मूक फेरी काढण्यात आली. गांधी मैदान येथून सुरू झालेल्या मूक फेरीची सांगता पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.
शांततेच्या काळात भारताच्या सुपुत्रांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सातारकर नागरिकांच्यावतीने गांधी मैदानावरून मूक फेरीस प्रारंभ झाला. ही फेरी महात्मा गांधी मैदान, मोती चौक, कर्मवीर भाऊराव पाटील पथ, (खालचा रस्ता) मार्ग पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली.

यावेळी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून या फेरीची सांगता झाली. मूक फेरीमध्ये मुस्लिम जागृती अभियान, सत्य शोध, मुक्तीवादी संघटना, विद्रोही संस्कृतिक चळवळ, एक रजा फौंडेशन, सातारा जनरल वर्कर्स युनियन, शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, लेक लाडकी अभियान, मुस्लिम ओबीसी संघटना, सातारा शैक्षणिक आणि सांस्कृतिक संघटना, अक्षर मानव, आशा- अंगणवाडी कर्मचारी संघटना, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी, सातारा शहर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारिप बहुजन महासंघ, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भटके विमुक्त जमाती संघटना, श्रमिक मुक्ती दल, संबोधी प्रतिष्ठन, टिळक मेमोरियल चर्च, विमा कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)