शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला सिद्धू गैरहजर?

अमृतसर – जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारताच्या सीआरपीफ जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात पंजाबमधील 4 जवान शहिद झाले आहेत. या शहिद जवानांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमसाठी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी कॅबिनेट मंत्री नवज्योत सिद्धू यांना हजर राहण्यास सांगितले होते. त्यानंतरही मुजोरी दाखवत सिद्धू शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला विलंबाने पोहचले. त्यामुळे देशभरातून सिद्धूविरोधात नाराजीचा सूर आहे. तसेच सिद्धूची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी देशभरातून होत आहे.

पंजाबचे मंत्री विपुल गोयल यांनी सिद्धू यांना ताबडतोब बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणी केली आहे. सिद्धूने ज्या पद्धतीने वक्तव्य केले आहे, त्यानुसार त्याला कोणतंही संविधानिक पद भूषवण्याचा अधिकार नाही.
केंद्र सरकार एकीकडे संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे सिद्धू आपल्या देशाऐवजी दहशतवादी राष्ट्राचे समर्थन करत आहे. त्यामुळे सिद्धूला पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी कॉंग्रेसच्याच मंत्र्याने केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, सिद्धूच्या अशा वागण्यामुळे पंजाबच्या कॅबिनेटमधील मंत्री त्यांच्यावर नाराज आहेत. सिद्धूची पंजाबच्या कॅबिनेटमधून हकालपट्टी करा अशी मागणी आता होऊ लागली आहे. या घटनेमुळे #SackSidhuFromPunjabCabinet असा एक हॅशटॅग ट्‌विटरवर ट्रेंड होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)