सिद्धरामैय्या यांची राहुल गांधींना ऑफर कर्नाटकातून उभे राहा

बंगळुरू: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणूक दक्षिण भारतातून लढवावी त्यासाठी त्यांनी कर्नाटकातील कोणत्याही मतदार संघातून उभे राहावे त्याचा पक्षाच्या यशावर चांगला परिणाम होईल असे आवाहन कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी केले आहे. त्यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख भारताचे पुढचे पंतप्रधान असा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांनीही कर्नाटकातून निवडणूक लढवली होती त्यांचेच अनुकरण राहुल गांधी यांनी करावे अशी सुचनाहीं त्यांनी केली आहे.

कर्नाटकाने नेहमीच कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांच्या बाजूने आपला कौल दिला आहे. त्यांच्या सत्तेतील पुनरागमनाचा मार्ग ही येथूनच प्रशस्त झाला आहे त्यामुळे त्यांनी कर्नाटकातून निवडणूक लढवावी अशी आपली इच्छा आहे असे त्यांनी म्हटले आहे. इंदिरा गांधी यांनी 1978 मध्ये कर्नाटकातल्या चिकमंगळूर मधून तर सोनिया गांधी यांनी बेल्लारी मतदार संघातून 1999 साली निवडणूक लढवली होती. यावेळच्या जागा वाटपात चिकमंगळूरची जागा कॉंग्रेसने जेडीएस पक्षाला सोडली आहे पण बेल्लारीची जागा कॉंग्रेसकडेच राहीली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)