श्रुति हासन आणि मायकल कोरसेलचे ब्रेकअप

मुंबई – बॉलीवूडमधील अभिनेत्री श्रुति हासन आणि तिचा इटालियन बॉयफ्रेंड मायकल कोरसेल यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. हे दोघांची रिलेशनशिप 2016पासून सुरू होती. श्रुतिच्या 33व्या वाढदिवशी म्हणजे 28 जानेवारीलाही हे कपल लॉस एंजिलिस येथे एकत्रित दिसले होते. या दोघांमध्ये मागील महिन्यापर्यंत सर्वकाही ठिक होते. पण अचानक या दोघांचे ब्रेकअप झाल्याने सर्वांनाच आश्‍चर्य वाटत आहे.

मायकलने गतमहिन्यातच श्रुतिसोबतचा आपला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत “गलफ्रेंड’ असे लिहिले होते. पण आता अचानक ब्रेकअप झाल्याने सर्वजण हैराण आहेत. हे दोघेजण काही दिवसांपासूनच आपसी सहमतिने विभक्‍त झाले आहेत. त्यांच्यात कोणतीही नाराजी नसल्याचे समजते. ब्रेकअपनंतरही दोघांमधील मैत्रीपूर्ण संबंध कायम आहेत. पण ब्रेकअपनंतर श्रुतिने सोशल मीडियावरील मायकलसोबतच्या काही पोस्ट डिलीट केल्या आहेत.
दरम्यान, मायकल आणि श्रुति यांची भेट लंडनमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली होती. तसेच भारतात आल्यानंतर मायकल याने श्रुतिचे वडिल कमल हासन यांचीही भेट घेतली होती. याशिवाय मायकलने कमल हासन यांच्या “विश्‍वरूपम 2’मध्ये रशिय सैनिकाचीही भूमिका साकारली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)