श्रीपाद छिंदमसह ६० जणांना आज शहर बंदी

शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर कारवाई

नगर:  शहर पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अक्षेपार्ह वक्तव्य करणारा भारतीय जनता पक्षाचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम, त्याचा भाऊ श्रीकांत याच्यासह 60 जणांना शहरात एक दिवस बंदीची नोटीस बजावली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तोफखाना पोलिसांनी 50, तर कोतवाली पोलिसांनी 10 जणांवर ही कारवाई केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवाजी महाराज यांची जयंती तारखेप्रमाणे उद्या मंगळवारी साजरी होत आहे. यापार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यात प्रामुख्याने शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेला माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा देखील समावेश आहे. शिवाजी महाराज जयंती शहरासह जिल्ह्यात उत्साहाने साजरी केली जाते. लोकसभा निवडणुकीची पार्श्‍वभूमी लक्षात घेता शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे. हिंदू-मुस्लिस वादातील, दंग्यातील आणि सण-उत्सवाच्या काळात दंगा किंवा मारामाऱ्या करणाऱ्यांवर प्रामुख्याने प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली व तोफखाना पोलिसांनी एक दिवसाच्या मनाईचे प्रस्ताव तातडीने करून प्रांताधिकारी कार्यालयाकडे सादर केले होते. त्यानुसार त्यावर कार्यवाही होऊन पोलिसांनी संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. भिंगार कॅम्प पोलिसांनी मुंबई पोलीस अधिनियमातील 107 मधील तरतुदींनुसार दहा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)