साईबाबांना चांदीचे सिंहासन

शिर्डीः नोयडा येथील साईभक्त प्रशांत श्रीवास्तव यांनी साईचरणी पावणे आठ लाख रुपयाचे चांदीचे सिहासन, फोटोफ्रेम अर्पण केले. (छाया- राजकुमार जाधव )

शिर्डी – नोयडा येथील साईभक्त प्रशांत श्रीवास्तव यांनी 21 किलो 502 ग्रॅंम वजनाचे चांदींचे सिंहासन, फोटो फ्रेम व पाट साईचरणी अर्पण करण्यात आले.या वस्तुंची किंमत सुमारे पावणे आठ लाख रुपये आहे. साईबाबांच्या देणगीत रोकड रक्‍कमेबरोबर आता सुवर्ण व चांदीचे दानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

साईभक्त प्रशांत श्रीवास्तव यांनी साईबाबांना दिलेल्या या चांदींच्या दानाची किंमत 7 लाख 74 हजार 72 रुपये इतकी आहे. त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अग्रवाल यांच्या हस्ते चांदीचे सिहासन, फोटो फ्रेम व पाट या वस्तुंची विधीवत पुजा करण्यात आली. यातील सिंहासन व फोटो फ्रेमचा वापर समाधी मंदिरातील श्रींच्या फोटोसाठी करण्यात येणार असून पाटाचा वापर मंदिरातुन दर गुरुवारी निघणाऱ्या पालखीतील पादुका व सटका ठेवण्यासाठी करण्यात येईल.

साईबाबांच्या कृपेने भाविकांच्या इच्छापूर्ण होत असल्याने भक्‍तगण साईबाबांना भरभरुन दान टाकत आहे. यावर्षी गुरुपौर्णिमेस तीन दिवसात भाविकांनी 6 कोटी 66 लाखाचे विक्रमी दान टाकले होते. दिवसेंदिवस साईबाबांना येणाऱ्या दानात वाढ होत आहे.भारतात दोन क्रमांकाचे तर महाराष्ट्रात एक नंबरचे श्रीमंत देवस्थान म्हणुन साईबाबा देवस्थानची गणना केली जात आहे. भक्तांकडुन आलेल्या दानातुन साईबाबा संस्थान भक्तांना माफक दरात भक्तनिवास, मोफत प्रसादभोजन तसेच विद्यार्थ्यांना अत्यल्प फी मध्ये शिक्षण, मुलींना मोफत शिक्षण, स्वस्त दरात रुग्णालय सेवा देत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)