श्रद्धांजली : हरहुन्नरी माडगूळकर

-शांताराम वाघ

मानवी जीवनातील कुटुंबसंस्था ही फार मोलाची आहे. बालपणापासून माणूस इथेच घडतो, इथेच वाढतो आणि या कुटुंबाच्या सुखासाठीच जन्मभर प्रयत्न करत असतो. प्रत्येक कुटुंबातील प्रतिभावंत साहित्यिक हरपला’ गदिमांचे सुपूत्र श्रीधर माडगूळकर यांचा नुकताच पुणे येथे मृत्यू झाला. कै गदिमांच्या गीतरामायणांतील “पुत्र सांगती चरित पित्यांचे ‘ हे शब्द त्यांचे पुत्र श्रीधर माडगूळकर यानी अक्षरश: खरे करून दाखविले .

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या पित्याच्या जन्म शताब्दि वर्षातच त्यांचा मृत्यू व्हावा ही एक धक्‍कादायक घटनाच आहे. आपल्या पित्याचा व कांकांचा ( व्यंकटेश माडगूळकर ) साहित्य, कथा व काव्य यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या श्रीधर माडगूळकर यानी साहित्याच्या सर्वच क्षेत्रात आपली प्रतिभा दाखविली. कथा, कविता, निवेदन, संपादक, कांदबरीकार, राजकारण व समाजकारण या सर्वच क्षेत्रात त्यानी आपली लेखणी चालविली.

त्यांची “आठी आठी चौसष्ठ” ही कांदबरी प्रसिध्द आहे. गीतरामायणाबद्दल त्यानी निवेदन करून ते जनमानसांत अधिक लोकप्रिय करण्यात फार मोठा वाटा श्रीधर माडगूळकर यांचा होता. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी त्यांचा सहभाग गदिमा प्रतिष्ठान व माडगूळ येथील गजानन प्रतिष्ठान यांच्या स्थापनेच्या रुपाने दाखवून दिला होता. एक तरूण संपादक म्हणून त्यानी जिप्सी हे मासीकही 1970 साली चालविले होते या मासीकातून त्यानी अनेक नव लेखकांना संधी दिली होती. तसेच धरती व मायभूमी या नियतकालिकाचे ही त्यांनी संपादक म्हणून काम केले होते.

गदिमांच्या आठवणींवरील “ंमंतरलेल्या आठवणी’ हे त्यांचे पुस्तक गाजले आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे गोवा येथे झालेल्या आठव्या शेकोटी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आपल्या पित्याप्रमाणे त्यांनी राजकारणांतही भाग घेतला.1978 साली पुणे शहर युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीस पदी त्यांची निवड झाली होती. कामगारासाठीही त्यांनी उल्लेखनीय काम केले.

कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी शिवाजीनगरमधून दोनदा विधानसभा निवडणुक लढविली. पण त्यांत त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी राजकारणांतून अंग काढून घेतले. त्यांच्या निधनाने एका सव्यसाची साहित्यिकाला आपण मुकले आहोत. विविध क्ष्रेत्रांत आपल्या भरीव कामगिरीने स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या श्रीधर माडगूळकर याना भावपुर्ण श्रध्दांजली!..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)