श्रीकृष्ण जन्माष्टमी : संपूर्ण देशात जन्माष्टमीची धामधूम, ‘हा’ आहे पूजेचा शुभ मुहूर्त

आज संपूर्ण देशात जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. लोक देवकीनंदन भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याच्या तयारीत आहेत. भगवान श्रीकृष्णाचा जन्म भारतातच नाही तर पूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात, आनंदात साजरी केली जाते. जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस.

भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीत २८ व्या युगात देवकी पुत्रश्रीकृष्ण जन्मले होते असे ब्रह्मपुराणात सांगितले आहे. त्या दिवशी जन्माष्टमीचे व्रत करण्याची प्रथा सुरु झाली. गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.

यावेळेस अष्टमी तिथिस 2 सप्टेंबरच्या रात्री 08.47 वाजल्यापासून सुरूवात होईल आणि अष्टमी तिथि 3 सप्टेंबरच्या रात्री 07.20 वाजता समाप्त होईल. जन्माष्टमीच्या पूजेची वेळ ही 2 सप्टेंबर 2018 च्या रात्री 11.57 पासून ते रात्री 12.48 अशी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)