अश्‍लील हावभाव करणाऱ्याला श्रद्धा कपूरने शिकवला धडा

“आशिकी 2′, “एक व्हिलन’ आणि “हैदर’सारख्या हिट सिनेमांनंतर श्रद्धा कपूरच्या “ओके जानू’ आणि “एक हसीना’सारख्या सिनेमांना बॉक्‍स ऑफिसवर फारसे यश मिळाले नव्हते. आता श्रद्धा “स्त्री’ या एका हॉरर कॉमेडीमध्ये राजकुमार रावबरोबर असणार आहे. त्यात महिलांना हीन वागणूक देणाऱ्या पुरुषांना त्या वेदनांचा अनुभव देणाऱ्या मुलीचा रोल ती करणार आहे. सध्या पायाला दुखापत झालेली असतानाही ती “स्त्री’च्या प्रमोशनमध्ये सहभागी झाली आहे.

महिलांना दुय्यम वागणूक देणे ही भारतीय पुरुषांची मानसिकता खूप खोलवर रुजलेली आहे. बॉलीवूडमध्येही त्याचे पडसाद दिसत असतात. नायकांच्या तुलनेमध्ये नायिकांना कमी मानधन दिले जाते, असे म्हटले जाते. मात्र, अनेक रोल असेही असतात ज्यामध्ये हिरोईन आपली छाप सोडू शकतात. हिंदी फिल्म इंडस्ट्रीतल्या काही अॅॅक्‍ट्रेस आज बिजनेस वुमन झाल्या आहेत. अनुष्का प्रोड्युसर आहे. दीपिका आणि आलिया क्‍लोदिंग लाईनमध्ये आहेत. ही बाब खूपच इन्स्पायरिंग आहे. जर संधी मिळाली तर मी देखील प्रोड्युसर व्हायला तयार आहे, असेही तिने सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महिलांबाबतचा सर्वसामान्य पुरुषांचा दृष्टिकोन किती घाणेरडा असू शकतो, याचा अनुभव स्वतः श्रद्धाने घेतला आहे. लहानपणी शॉर्ट ड्रेसचा युनिफॉर्म घालून शाळेतून परत येत असताना तिच्या कार जवळ एक मुलगा घुटमळताना तिला दिसला होता. त्याने श्रद्धाला बघून “किसींग’चा आविर्भाव केला आणि कसलासा आवाजही तोंडाने काढला. ते पाहून श्रद्धा जाम भडकली आणि तिने या मुलाला यथेच्छ तुडवले. पुन्हा दिसलास तर तक्रार करेन अशी तंबी दिल्यावर तो मुलगा गायब झाला. हे धैर्य आपल्या अंगी येण्याचे सगळे श्रेय श्रद्धाने आई-वडिलांना दिले आहे. खरे तर वडील शक्‍ती कपूर हे हिंदी फिल्म इंडस्ट्रीतले नावाजलेले खलनायक आहेत. पडद्यावर त्यांनी कित्येक हिरोईनबरोबर बलात्कार आणि विनयभंगाची दृश्‍ये केली आहेत. पण प्रत्यक्षात आपल्या मुलीला अशा प्रसंगांना कसे सामोरे जायचे याचे अनौपचारिक शिक्षणही दिले आहे. ही बाब जरा हटके वाटते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)