श्रद्धा कपूरला झाला डेंग्यू 

श्रद्धा कपूर सध्या बॅडमिंटनपटू साईना नेहवालचा बायोपिक असलेल्या “साईना’मध्ये लीड रोल करते आहे. नुकताच तिचा “बत्ती गुल, मीटर चालू’ रिलीज झाला. पण त्याला विशेष चांगला रिस्पॉन्स मिळाला नव्हता. पण त्यापूर्वी “स्त्री’ रिलीज झाला आणि त्याला बॉक्‍स ऑफिसवर खूप चांगला रिस्पॉन्सही मिळाला होता. “साईना’चे शुटिंग सुरू झाले पण लगेचच शुटिंग थांबवायला लागले आहे. श्रद्धाला डेंग्यू झाल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले.
श्रद्धाला शुटिंग करणे शक्‍य नसल्याने दिग्दर्शक अमोल गुप्तेने शुटिंग थांबवण्याऐवजी साईनाच्या बालपणच्या सीनचे शुटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रद्धा पूर्ण बरी होईपर्यंत साईनाच्या बालपणाचे सर्व सीन शूट करून घेतले जातील. साईना नेहवालचा रोल साकारणे आपल्यासाठी आतापर्यंतचा सर्वात अवघड रोल असल्याचे तिचे म्हणणे आहे. श्रद्धाने या रोलसाठी जवळपास दिडवर्ष बॅडमिंटनचे ट्रेनिंग घेतले आहे. पण अजूनही आपण साईनासारखे या खेळात परिपक्‍व झाल्याचे तिला वाटत नाही. तिच्यामते बॅडमिंटन खूपच अवघड खेळ आहे. तिच्या या कष्टाचे स्वतः साईनानेही कौतुक केले होते. आता लवकरच श्रद्धा बरी झाल्यावर ती या रोलमध्ये पुन्हा ऍक्‍टिव्ह होईल.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)