पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार श्रद्धा कपूर?

बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठा सतत चर्चेत असतात. रोहन हा सुप्रसिद्ध फोटोग्राफर रोकश श्रेष्ठा यांचा मुलगा असून तो नेपाळमधील फुटबॉलपटू म्हणून त्याची ओळख आहे. सोशल मीडियावर रोहन आणि श्रद्धाचे फोटो कायम व्हायरल होत असतात. आता हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे समजते.

श्रद्धा आणि रोहन हे कपल पुढील वर्षी लग्न करू शकतात. हे दोघे जण एकमेकांना 2 वर्षांपासून डेट करत असून ते आता या संबंधाला अधिकृत नाते देवू इच्छित आहेत. यामुळेच श्रद्धाची आई शिवांगी कपूर ही आतापासूनच लग्नाच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रद्धा आणि रोहन यांच्या लग्नाबाबत शक्‍ती कपूर यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार देत हे वृत्त फेटाळून लावले. ते म्हणाले, आणखी 4-5 वर्षे लग्न करण्याचा श्रद्धाचा कोणताही विचार नाही, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, श्रद्धाच्या वर्कफ्रंटबाबत बोलयाचे झाल्यास तिचा आगामी “साहो’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात “बाहुबली’ स्टार प्रभाससोबत ती झळकणार आहे. याशिवाय नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, महेश मांजरेकर आणि मंदिरा मेदी आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)