श्रद्धा कपूर लग्नाच्या तयारीला

गेल्या वर्षाप्रमाणेच या वर्षी देखील बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. फरहान अख्तर- शिवानी दांडेकर, रणबीर कपूर- आलिया भट आणि अर्जुन कपूर- मलायका अरोरा या जोड्या तर लवकरच विवाहबंधनात अडकण्याची शक्‍यता आहे. अजूनपर्यंत यापैकी कोणाच्याही लग्नाचा मुहुर्त निघालेला नाही. आता या सेलिब्रिटीजमध्ये श्रद्धा कपूरचेही नाव जोडले गेले आहे.

बॉयफ्रेंड आणि सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठाबरोबर पुढच्या वर्षी श्रद्धा विवाहबद्ध होण्याची शक्‍यता आहे. श्रद्धा आणि रोहन दोघेही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतात. दोघांनी 2018 पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आहे. श्रद्धाच्या घरच्यांनाही त्यांच्यातले रिलेशन मान्य आहे. त्यांनी यासंदर्भात रोहनशी चर्चाही केली आहे. श्रद्धा सध्या सुशांत सिंह राजपूतबरोबर “छिछोरे’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

त्याशिवाय प्रभासबरोबरचा तिचा “साहो’पण रिलीज होण्यासाठी तयार झाला आहे. वरुण धवनबरोबर “स्ट्रीट डान्सर’मध्येही ती काम करते आहे, पण बॅडमिंटनपटू साईना नेहवालच्या बायोपिकमधून तिने नुकतीच माघार घेतल्याचेही समजले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)