श्रद्धा कपूरने सोडला ‘हा’ चित्रपट

भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित चित्रपटातील अभिनेत्री श्रद्धा कपूरचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. यात श्रद्धा कपूर सायनाची मुख्य भूमिका साकारत असून तिने स्वत: आपला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. ती हुबेहुब सायनासारखी दिसत आहे. मात्र अभिनेत्री श्रद्धा कपूरने हा चित्रपट सोडला आहे. आता या बायोपिकमध्ये श्रद्धाऐवजी दुसरा चेहरा झळकणार आहे.

एका इंग्रजी वृत्तदिलेल्या माहितीनुसार, बॅडमिंटनच्या काही महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर श्रद्धाने शूटिंगला सुरुवात केली होती. पण शूटिंग सुरू होताच काही दिवसांनी तिला डेंग्यू झाला. त्यानंतर तिने तिच्या दुसऱ्या चित्रपटांसाठी काही वेळ दिला. एप्रिलमध्ये पुन्हा सायनाच्या बायोपिकचं शूटिंग सुरू होणार होते मात्र श्रद्धाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हा निर्णय घेण्यात समजते आहे. ‘छिछोरे’ आणि ‘स्ट्रीट डान्सर’ या दोन चित्रपटांमध्ये सध्या श्रद्धा व्यस्त आहे. त्याचप्रमाणे प्रभाससोबतचा ‘साहो’ चित्रपटसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)