-डाॅ. पियुष नाशिककर
खांदा निरोगी राखण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे खांद्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करणे आणि आवश्यक तेव्हा अस्थिरोगतज्ज्ञाचा सल्ला घेण्यास टाळाटाळ न करणे. तज्ज्ञाचा सल्ला घेणे म्हणजे शस्त्रक्रिया नव्हे, तर एक निरोगी खांदा पूर्ववत प्राप्त करण्याची हमी नक्कीच आहे.
खांदा दुखीसाठी आपत्कालीन मदत कधी घ्यावी ?
कोणतीही इजा झाली नसता खांदा अचानक दुखत असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. हृदयविकाराच्या इतर लक्षणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत जळजळ होणे, घेरी येणे, जास्त प्रमाणात घाम येणे, मान किंवा जबडा किंवा पोटाच्या वरच्या भागातील (एपिगॅसट्रीम) वेदनांचा समावेश होतो.
आपल्याला खांद्याच्या वेदनेसह तापाची कणकण असेल किंवा खांद्याची हालचाल करण्यास असमर्थता असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. खांद्याला अपघाती इजा झाली किंवा खांदा निखळला असल्यास अस्थिरोगतज्ज्ञाचा सल्ला घ्या.
खांदे-दुखीवर उपचार व पर्याय काय ?
बहुतेकवेळा शस्त्रक्रियेविना खांदा दुखणे बरे होऊ शकते. काही उपचार पर्यांयामध्ये अल्पकाळ विश्रांती, बर्फाचा शेक, फ़िजिओथेरपी, स्लिंग वा इनमोबीलायझर ब्रेस, स्टेरॉईड इंजेक्शन व शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो. अनेकदा दुखण्यावर आणि सुजेवर डॉक्टर औषधे देतात.
खांद्यावर शस्त्रक्रियेची आवशकता असेल तर आजकाल बहुतेक शस्त्रक्रिया या दुर्बिणीद्वारे केल्या जातात, याला की-होल शस्त्रक्रिया म्हणतात. सांधा निरोपण (जॉईंट-रिप्लेसमेंट) शस्त्रक्रियेचा सल्ला इतर पर्यायी उपचार संपल्यावर दिला जातो.
खांदा दुखणे एक वेदनादायक त्रास (भाग 1)
खांदा दुखणे एक वेदनादायक त्रास (भाग 3)
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा