“गुगली’ वक्‍तव्य करणाऱ्या मंत्र्यावर कारवाई करावी : हरसिमरत कौर यांची इम्रान खान यांच्याकडे मागणी

नवी दिल्ली: करतारपूर कोरिडोरच्या भूमिपूजन समारंभाला भारताचे दोन मंत्री उपस्थित राहणे म्हणजे इम्रान खान यांनी टाकलेल्या “गुगली’चा परिणाम होता, असे वक्‍तव्य करणाऱ्या पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यावर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे केली आहे. विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनीही पाकिस्तानचे विदेश मंत्री महमूद कुरेशी यांच्या “गुगली’शी संबंधित शेरेबाजीवर तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे. कुरेशी यांनी केलेले “गुगली’ चे वक्‍तव्य संतापजनक आणि शिख भाविकांच्या भावना दुखावणारे आहे. त्याची दखल घेऊन कुरेशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कौर आणि स्वराज या दोघींनीही ट्‌विटद्वारे केली आहे.

करतारपूर कोरिडोर भूमिपूजनाच्या समारंभादरम्यान इम्रान खान यांनी भारताबरोबर चर्चेची तयारी दर्शवली होती. मात्र सीमेपलिकडील दहशतवाद थांबत नाही, तोपर्यंत चर्चेची प्रक्रिया पुन्हा सुरु होणार नसल्याचे विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना “इम्रान खान यांनी टाकलेल्या गुगलीमुळे भारत कोंडीत सापडला’ असे कुरेशी यांनी म्हटले होते.

-Ads-

करतारपूर साहिब येथील कोरिडोर भूमिपूजनाच्या समारंभाच्या निमंत्रणावरून दोन केंद्रीय मंत्री उपस्थित राहिले होते. शिख भाविकांनीही करतारपूर कोरिडोरचे स्वागत केले होते. याचे भान इम्रान खान यांनी ठेवायला हवे. शांतता प्रक्रिया सुरु राखण्यासाठीची आपली कटिबद्धता विसरू नये, याची आठवणही हरसिमरत कौर यांनी इम्रान खान यांना करून दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)