पुणे – महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी निधीच्या वर्गीकरणासंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सर्वसाधारण सभेने मंजुर केलेल्या सभासदांच्या “स’ यादीतील कामांचा समावेश नाही. तरीही सदस्यांनी सूचविलेल्या वर्गीकरणांबाबत प्रशासकीय पातळीवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे झाल्यास यावर्षीच्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी होणार नाही, पर्यायाने विकासाला खीळ बसेल. Should revise the circular of the Commissioner: Barate
प्रशासनाने या मार्गदर्शक सुचनांबाबत काढलेल्या परिपत्रकाचा फेरविचार करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. दिलीप बराटे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. हा गोंधळ असाच सुरू राहिल्यास अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करणे अवघड होणार आहे. याचा फटका शहराच्या विकासाला बसणार आहे. ही बाब गंभीर असून लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी व प्रशासन यांचा समन्वय करून परिपत्रकाचा फेरविचार करावा. अन्यथा प्रशासन, नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये संघर्ष होतील, असेही ते म्हणाले.