कमावत्या मुलांना मदत करावी का? (भाग-१)

नात्यातील कुणाकडून पैशाचा विषय निघाला की, आपली परिस्थिती अवघडल्यासारखी होते. आता हे झाले बाहेरच्य व्यक्तींबाबत. परंतु स्वतःच्या मुलानेच आर्थिक मदत मागितली तर ?

अगदी घट्ट आणि मायेच्या नात्यालाही अनेकदा पैशाची दृष्ट लागते. पैशाच्या वादातून पती-पत्नीच्या खासगी बाबींवर अतिक्रमण होते. उदाहरणार्थ – पत्नीच्या शॉपिंगच्या सवयी, भावंडांमधील वाटण्यांवरून निर्माण होणारा दुरावा. उसन्या घेतलेल्या पैशावरून मैत्रीत दुरावा निर्माण होणे अशा घटनांमधून नाती दुरावतात किंवा कायमची तुटतात. त्यामुळेच नात्यात पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्यावी लागते. कारण पैसा आला की, नात्यामध्ये कुरबुरी सुरु होतात. मग ते नाते मैत्रीचे असो की, कुटुंबातील.

तुमच्या सहकाऱ्याने तुमच्याकडून पैसे उसने घेतलेले असतात. ते पैसे परत करावेत म्हणून तुम्ही त्याला आठवण करून देता आणि तो विसरून जातो. अशा वेळी काय करावे ? नातेवाईक तुम्हांला त्यांच्या कर्जासाठी जामीन राहायला सांगतात किंवा तुमच्या भावंडाला तुमच्यासोबत स्टार्टअपमध्ये भागीदार म्हणून यायचे आहे. अशा प्रसंगात काय करावे असा प्रश्न पडतो. नाती आणि पैसा एकत्र आले की अनेक गुंतागुंतीचे विषय तयार होऊ लागतात.

नात्यातील कुणाकडून पैशाचा विषय निघाला की, आपली परिस्थिती अवघडल्यासारखी होते. आता हे झाले बाहेरच्य व्यक्तींबाबत. परंतु स्वतःच्या मुलानेच आर्थिक मदत मागितली तर ?

1) एकवेळ मदत मागितली आहे की, सतत पैशाची मागणी होत असते?

हा महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्याकडे बाजूला ठेवलेली रोकड नसेल आणि निवृत्तीनंतर लागणार म्हणून बाजूला ठेवलेल्या बचतीतूनच तुम्हांला पैसे द्यावे लागणार असतील तर तुम्ही मुलाला नम्रपणे नकार कळवा. तुम्ही निवृत्तीसाठी पैसा राखून ठेवला असेल तर तो पैसा धोक्यात घालून मुलाने नवा व्यवसाय किंवा स्टार्टअप करण्याची काहीही गरज नाही. निवृत्तीनंतर सन्मानाने जगण्यासाठी काढून ठेवलेला पैसा त्याच कारणासाठी वापरला गेला पाहिजे. अन्य कुठल्याही कारणासाठी तो पैसा वापरला जाणे म्हणजे संकटाला निमंत्रण देण्यासारखे असते. त्याउलट तो पहिल्यांदाच पैसे मागत असेल आणि तुम्हांला निश्चितपणे माहित असेल की, तो खरोखच आर्थिक पेचप्रसंगात सापडला आहे तर तुम्ही त्याला पैशाची मदत करण्यास हरकत नाही. पण त्यासाठी अतिशय व्यावसायिक पद्धतीने वागण्याची गरज असते. पैसे धनादेशाद्वारे देणे आणि ते पैसे ठरलेल्या कामासाठीच वापरले जात आहेत यावर लक्ष ठेवणे. त्याचबरोबर ठराविक कालावधीत ते पैसे परत मिळण्याची अट घालणे इत्यादी गोष्टी कराव्या लागतात. अन्यथा पैशाची सतत मागणी होऊ शकते. आता तुमचा मुलगा प्रौढ झाला आहे हे लक्षात घेऊन त्याच्याशी पैशाचे व्यवहार करावेत.

कमावत्या मुलांना मदत करावी का? (भाग-२)

2) निवृत्तीनंतरच्या तुमच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो –

जर आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मुलाला पैसे हवे असतील तर त्याला पर्यायी उपाय सुचवा. मुलगा कर्ज घेऊन गरज भागवू शकतो. विमा पॉलिसी किंवा सोन्यावर कर्ज घेऊ शकतो किंवा त्याची काही वैयक्तिक संपत्ती असेल तर त्यावर कर्ज घेऊ शकतो. त्याच्याकडील पर्याय वापरण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ असू शकतो. हे सगळे टाळून तुमच्या निवृत्तीनंतर लागणाऱ्या पैशाची कुणीही मागणी केली तरी त्या पैशाला हात लावू नका. नात्यातील आणि विशेषतः मुलाला दिलेले पैसे परत येण्याची शक्यता कमीचअसते.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)