कमावत्या मुलांना मदत करावी का? (भाग-२)

नात्यातील कुणाकडून पैशाचा विषय निघाला की, आपली परिस्थिती अवघडल्यासारखी होते. आता हे झाले बाहेरच्य व्यक्तींबाबत. परंतु स्वतःच्या मुलानेच आर्थिक मदत मागितली तर ?

कमावत्या मुलांना मदत करावी का? (भाग-१)

3) पैसा कशासाठी पाहिजे?

फ्लॅट घेण्यासाठी किंवा फार्म हाऊस, जमिन घेण्यासाठी तुमच्याकडून पैसे हवे असतील तर तुम्ही थेट नकार देऊ शकता. समजा रुग्णालयाचा किंवा अचानक उद्भवलेला वैद्यकीय खर्च असेल तर अर्थातच जवळ असणारे पैसे मुलासाठी खर्च करावेत. कारण पैशापेक्षा जीव महत्त्वाचा असतो. खरे तर प्रत्येकाने वैद्यकीय संकटाची तयारी म्हणून आरोग्य विमा व इतर तरतुदी करून ठेवणे गरजेचे असते. समजा अशी व्यवस्था करण्यात आली नसेल तर निवृत्तीनंतरच्या निधीला हात लावण्याआधी तुमच्याकडील संपत्ती विकून पैसा उभा करा.  दुसरीक़डे फ्लॅट किंवा जमीन घेण्यासाठी पैसे हवे असतील तर कर्जाऊ पैसे देऊन तुम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये निम्म्या हिश्शासाठी तुमचे नाव लावून घेऊ शकता. मुख्य म्हणजे स्वतःच्या आर्थिक अडचणी मुलाने स्वतः सोडवल्या पाहिजेत या भूमिकेवर ठाम रहा.

4) पैसे दिल्याबाबत नोंदणी केलेला करार हवा –

तुम्ही जर का मुलाला कर्ज म्हणून मोठी रक्कम देत असाल तर त्यासंदर्भातील सर्व अटी व परत करण्याची तारखेनुसार माहिती लिहून तो करार नोंदणी करून घ्यावा. मूळ मुद्दल, त्यावरील व्याज असा सगळा तपशील त्यामध्ये असावा. त्यासाठी तज्ञ वकिलाची मदत घ्यावी. केवळ भावनिक होऊन मदत करू नका. हा पूर्णपणे व्यावसायिक व्यवहार आहे या भूमिकेतून त्याकडे पहा. जेणेकरून नंतर तुम्हांला पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही.

5) भावंडांना माहित असणे –

अनेकदा मुलाला अशा प्रकारे आर्थिक मदत करण्याचा विषय तुमच्या कुटुंबातील वातावरण कसे आहे यावरून किती गुप्त ठेवायचा हे ठरत असते. एका मुलाला आर्थिक मदत केल्यावर अनेकदा गरज नसताना विविध कारणे सांगून दुसऱ्या मुलाकडूनही आर्थिक मागण्या केल्या जातात. त्यामुळे असे व्यवहार नोंदणीकृत व धनादेशानेच करावेत, त्यामध्ये पत्नीलाही सहभागी करून घ्यावे. मात्र याची माहिती दुसऱ्या मुलापर्यंत शक्यतो पोचणार नाही याची काळजी घ्यावी. अर्थात,तुमच्या कुटुंबात तेवढे ऐक्य असेल तर त्याबाबत दुसऱ्या मुलाला सांगण्यास हरकत नाही.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)