व्हॅलेंटाईन खरेदीला तरुणाईची गर्दी

सातारा – फेब्रुवारी सुरू झाल्यापासूनच साताऱ्यातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींना व्हॅलेंटाईन डेचे वेध लागलेले दिसत आहेत. 14 फेब्रुवारीजवळ आल्याने शुभेच्छा संदेश, फुले, चॉकलेट किंवा अगदी आवडती वस्तू देऊन प्रेम व्यक्त करण्यासाठी तरून-तरुणींच्यात मोठा उत्साह दिसत आहे.

या काळात सातारा शहरात अनेक प्रकारच्या भेटवस्तू खरेदी करून प्रिय व्यक्तीला देण्यासाठी बाजारात युवकांची मोठी झुंबड उडाली आहे. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी बाजारात हार्टशेफ पिलो, म्युझिकल हार्ट, फ्लॉवर बास्केट, फोटो फ्रेम, लव्ह कोटेशन फ्रेम, लिफाफा ग्रीटिंग्ज, कपल किचेन, फॅन्सी चॉकलेट यासंह शॅम्पेन बॉटल किचन, लिप्स चॉकलेट, चॉकलेट बुके, हार्टशेप चॉकलेट आदी प्रकारचे चॉकलेट बाजारात उपलब्ध आहेत. मुलांसाठी परफ्यूम, वॉलेट, फॅन्सी बॅग, हार्टचे पेन्डेंट ब्रासलेट, ग्रीटींग्ज कार्ड अशा आकर्षक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. 40 पासून ते 5 हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू बाजारात आल्या आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)