“केजीएफ’च्या सिक्‍वलचे शूटिंग सुरू

बॉलीवूडमध्ये गतवर्षी प्रदर्शित झालेला साउथचा सुपरस्टार यश याचा “केजीएफ ः चॅप्टर-1′ चित्रपटाला चांगले यश मिळाले होते. या चित्रपटाने यशाची नवनवे शिखर पार करत अनेक विक्रमही प्रस्थापित केले होते. त्यानंतर चित्रपटाच्या सिक्‍वलबाबत चाहत्यांना उत्सुकता होता. आता चित्रपटाच्या पुढील सिक्‍वलचा अर्थात “केजीएफ ः चॅप्टर-2’चे शूटिंग सुरू करण्यात आले आहे.

याबाबत स्वःत चित्रपटातील अभिनेता यश याने ट्‌वीट करत माहिती दिली आहे. यासोबत त्याचे लिहिले की, आता प्रारंभ झाला आहे. “केजीएफ-1’ला सर्व चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता “केजीएफ-2’चा डबल धमाका करण्यासाठी तयार रहा. यासाठी आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद आवश्‍यक आहे. जर सर्व ठरल्याप्रमाणे घडल्यास चित्रपटाचा दुसरा भाग यावर्षी डिसेंबरपर्यत प्रदर्शित करण्यात येईल, असे त्यांने ट्‌वीट केले. “केजीएफ’च्या दुस-या भागात संजय दत्तसोबत रवीना टंडनही झळकणार आहेत.

दरम्यान, बॉलीवूडमध्ये घवघवीत यश मिळविलेल्या साउथमधील “बाहुबली’नंतर “केजीएफ’हा दुसरा चित्रपट आहे. “केजीएफ’च्या पहिल्या भागात यशसोबत श्रीनिधी शेट्‌टीने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने किंग खान शाहरुखच्या “झिरो’ चित्रपटाला टक्‍कर देत कोट्यवधीची कमाई केली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)