1 एप्रिलला सुरू होणार ‘दबंग 3’ चे शूटिंग

सलमान खानच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाचे शूटींग नुकतेच संपले आहे. ‘भारत’ चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. यात सलमान खानच्या विविधांगी रूपे पाहायला मिळाली. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातच सलमानने भारत चित्रपटाची शूटिंग नुकतीच संपविली आहे. यानंतर तो आगामी चित्रपट ‘दबंग3’ च्या शूटिंगमध्ये बिझी होणार आहे, लवकरच सलमान या सिनेमाची शूटिंग सुरु करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘दबंग3’ वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

Aaj 8 saal Ho Gaye Dabangg Ko… thank u for all the appreciation and love from Rajjo and Chulbul Pandey…see u in #Dabangg3 next year

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सलमान खानच्या दबंग 3 चे शूटिंग 1 एप्रिलपासून सुरु होणार असून डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानच्या अपोझिट सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. तर कन्नड स्टार किच्चा सुदीप हा ‘दबंग 3’मध्ये व्हिलेनच्या भूमिकेत दिसेल. प्रभूदेवा या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. तर मलायका आणि अरबाज खानचा मुलगा अरहान प्रभूदेवाला असिस्ट करणार आहे. अरहान ‘दबंग3’ मधून सहायक दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवतोय.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)