भाजप नेत्यावर पत्रकार परिषदेत भिरकावली चप्पल 

नवी दिल्ली – भाजप नेते जीव्हीएल नरसिंहराव यांची पत्रकार परिषद चालू असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर चप्पल भिरकावली. या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.

जीव्हीएल नरसिंहराव यांची भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद सुरु होती. अचानक उपस्थितांपैकी एकाने त्यांच्याकडे चप्पल भिरकावली. यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीचे नाव शक्ती भार्गव असून त्याने नेमक्या कोणत्या कारणाने चप्पल फेकली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

https://twitter.com/ANI/status/1118787043348373504

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)