“हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’ : शिवसेनेचा नवा नारा

लोकसभेच्या तोंडावर भाजपची चौफेर कोंडी 

अयोध्येतील वातावरण तापले 

-Ads-

राम मंदिराच्या मुद्यावर अध्यादेश काढण्याची मागणी 

नवी दिल्ली: राम मंदिराच्या मुद्यावर भाजपचे पितळ उघडे पाडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे अयोध्येत दाखल होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धर्मसभा आणि शिवसेनेचा कार्यक्रम एकाच दिवशी असल्यामुळे अयोध्येतील वातावरण तापले आहे.

शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक गुलाबचंद दुबे यांनी सांगितले की, राम मंदिराचा विषय शिवसेनेच्या अजेंड्यात पहिल्या क्रमांकावर असून राम मंदिराचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे 24 आणि 25 नोव्हेंबर अशा दोन दिवसाच्या दौऱ्यावर अयोध्येला येत आहेत. 24 तारखेला शरयू नदीच्या काठावर महाआरती होणार आहे. याशिवाय संपूर्ण राज्यात आरती करण्याचे आदेश उध्दव ठाकरे यांनी दिले आहे.

अयोध्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. याच बैठकीत ठाकरे यांनी मंदिराच्या समर्थनार्थ “हर हिंदु की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’ हा नवा नारा दिला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सेनेने हा नारा दिल्यामुळे भाजपची चौफेर कोंडी होण्याची शक्‍यता आहे.

राम मंदिराच्या मुद्यावर केंद्र सरकारने अध्यादेश आणावा, अशी उध्दव ठाकरे यांची मागणी आहे. या दोन दिवसाच्या दौऱ्यात अध्यादेशासाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. केंद्र सरकार तीन तलाकसह विविध मुद्यांवर अध्यादेश आणू शकते. मग मंदिरासाठी का आणू शकत नाही? असा प्रश्नही सेनेकडून उपस्थित केला जाणार आहे.

गुलाबचंद दुबे यांनी सांगितले की, राम मंदिराच्या मुद्यावर कुंभकर्णासारखी झोपलेल्या भाजप सरकारला जागे करणे ठाकरे यांच्या दौऱ्याचा मुख्य हेतू आहे. ते 24 तारखेला संत समाजाचा आशिर्वादही घेणार आहेत. 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येतील रामकथा प्रांगणात ठाकरे यांची सभा होणार आहे.

दरम्यान, उध्दव ठाकरे यांच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी देशभरातून दीड लाख लोक येणार असल्याचा दावा दुबे यांनी केला. गर्दी जास्त होवू नये म्हणून महिला आघाडी आणि युवा सेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांना अयोध्येच्या कार्यक्रमाला येण्याची मनाई करण्यात आली असल्याचे दुबे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
7 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)