मुंबई-गोवा महामार्गावर “शिवशाही’ला अपघात

संग्रहित फोटो

दापोली: एसटी महामंडळाच्या “शिवशाही’च्या अपघातांचे सत्र सुरुच आहे. मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी शिवशाहीचा अपघात झाला असून यात सहा जण जखमी झाले आहे. ही बस दापोलीवरुन मुंबईच्या दिशेने येत होती.

मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्‍यातील गडब गावाजवळ शिवशाही बसचा आणि मिनी डोअर रिक्षेचा अपघात झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास झाला. या अपघातानंतर नियंत्रण सुटलेली बस पलटली. यात बसमधील चार, तर रिक्षेतील दोन प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, वातानुकूलित शिवशाही बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर त्यांच्या सेवेपेक्षा अपघातमुळेच अधिक चर्चेत असते. शिवशाही वाहनांची लांबी, उंची, वजन, वाहनाची पुढील बाजू जास्त असून वाहनाच्या बॉडीचे जमिनीपासूनचे अंतर कमी आहे. यामुळेच वारंवार अपघात घडत असल्याचे समजते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)