शिंदेवाडीजवळ शिवशाहीला अपघात; 13 प्रवाशी जखमी

संग्रहित फोटो

शिरवळ  – आशियाई महामार्गावरील शिंदेवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीमध्ये 43 प्रवाशी घेऊन भरधाव वेगाने असलेल्या शिवशाही बस पुणे-महाबळेश्‍वर पलटी झाल्याने अपघातामध्ये 13 प्रवाशी जखमी झाले. याबाबतची शिरवळ पोलीसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या नियंत्रणाखाली असलेली शिवशाही बस (एमएच 47 वाय 565) हि पुणे-महाबळेश्‍वर बस खंडाळा तालुक्‍यातील शिंदेवाडी गावच्या हद्दीमध्ये आली असता चालक प्रशांत दत्तात्रय भोसले यांचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बस महामार्गालागत खड्डयांमध्ये जाऊन पलटी झाली. अचानकपणे घडलेल्या घटनेने प्रवाश्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे पोलीस कर्मचाऱ्यांसहित तात्काळ दाखल होत बसमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णवाहिका व खाजगी रुग्णवाहिकेतून तातडीने शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपस्थित नागरिकांच्या साहाय्याने दाखल केले. अपघातामध्ये शुभम धनंजय पवार (वय 23 रा.भिलार), हलाप्पा यशवंतराव गौड (वय 30, रा.खंडाळा), नीरज कुमार (वय 26, रा. दिल्ली), रौफ दिलावर पठाण (वय 36 रा.वाई ) नडेम वारणे (वय 40,रा.पुणे), सुभान बाबू (वय 24, रा. पाचगणी), रेखा संजय सावंत (वय 27 रा. मुंबई), लता चंदू खरे (वय, 45 रा.महाबळेश्‍वर), वसुधा वामन आगरकर (वय 71 रा. महाबळेश्‍वर) मनोहर अडसूळ (वय 23 रा. बीड), पिहू प्रकाश खरे वय 11, रा. महाबळेश्‍वर), शांताबाई बाळा खरे (वय 70 रा. महाबळेश्‍वर) रंग्या आनंद शेट्टी (वय 24 रा. मुंबई), लता छन्नु खरे (वय 45, रा. महाबळेश्‍वर) हे प्रवाशी जखमी तर दोन गंभीर जखमी झाले आहे. याबाबतची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून तपास हवालदार एस. आर. जगताप करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)