रायगड – रायगड जिल्ह्यातील लोणेरेजवळ राज्य परिवहन मंडळाच्या “शिवशाही’ बसला आज अपघात झाला. या अपघातात 31 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बस दापोलीवरुन पुण्याकडे निघाली होती.

चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात बस उलटल्याने 31 प्रवासी जखमी झाले. हा अपघात रिलायन्स पेट्रोल पंपजवळ घडला. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली. दरम्यान, राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बसच्या अपघाताच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)