पंढरपूरात 24 डिसेंबरला शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन

राम मंदिरासाठी अयोध्येतील शरयूप्रमाणेच चंद्रभागेच्या तीरावर करणार आरती

मुंबई: अयोध्येतील राममंदिराच्या निमित्ताने भाजप विरोधात आक्रमक झालेली शिवसेना येत्या 24 डिसेंबरला पंढरपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे अयोध्येतील शरयूप्रमाणेच चंद्रभागेच्या तीरावर आरती करणार आहेत. तसेच पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेऊन अयोध्येत राममंदिर बांधण्याची सुबुध्दी सरकारला द्या, असे साकडे घालणार आहेत. यावेळी मुंबई ते पंढरपूर दरम्यान धावणाऱ्या “विठाई’ या नव्या एसटी सेवेचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या महिन्यात उध्दव ठाकरे यांनी सहकुटुंब अयोध्येचा दौरा केला होता. अयोध्येत राममंदिर उभे रहावे म्हणून ठाकरे यांनी शरयू नदीच्या तीरावर आरती केली होती. तसेच रामजन्मभूमीला भेट देत रामलल्लाचे दर्शन घेतले होते. राममंदिर बांधण्यासाठी सरकारने लगेच अध्यादेश काढावा, शिवसेना त्याला पाठिंबा देईल, असे ठाकरे यांनी जाहीर केले होते. राममंदिराचा मुद्दा आणखी पुढे जावा म्हणून शिवसेनेने 24 डिसेंबरला पंढरपुरात एका सभेचे आयोजन केले आहे.
या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी शिवसेना भवनात उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना मंत्री आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत सभेच्या तयारीविषयी चर्चा करण्यात आली.

या सभेसाठी शिवसैनिकांसह राज्यभरातील वारकरी येणार आहेत. अनेक वारकरी संघटनांनी स्वत:हून सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. संघटना आणि पक्ष म्हणून आपण दुष्काळग्रस्तांना मदत करतच आहोत. तरीही आपण दुष्काळप्रश्नी सरकारला जागे केले पाहिजे, असे ठाकरे यांनी बैठकीत सांगितल्याचे कळते. दरम्यान बैठकीत मंत्र्यांवर सभा यशस्वी करण्यासाठी विविध प्रकारची जबाबदारी सोपविण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)