अमरावती – भाजपा आणि शिवसेना युतीच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभेस आजपासून सुरुवात झाली आहे. आज अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचे नारे देत भाषणास सुरुवात केली.
सामान्य माणुस ज्या आशेने आपल्याकडे बघतो, त्यांच्या आशेवरती पाणी नाही पडलं पाहिजे कारण शिवसेना-भाजप पक्ष देशातील सर्वसामान्य जनतेची शेवटची आशा आहे असे म्हणताना उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान एकदाही काल मुंबईत झालेल्या पूल दुर्घटनेचा उल्लेख केला नाही. त्यामुळे त्यांना प्रचाराचीच चिंता असून मुंबईकरांचा विसर पडला आहे का, त्यांनी मुंबईकरांना वाऱ्यावर सोडले आहे का? अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे.
दरम्यान, काल मुबंईतील सीएसएमटी स्टेशनजवळ काल संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई महापालिकेचा पूल कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू तर 31 जण जखमी झाले. मुंबई पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे, त्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दुर्घटनेतील जखमींची विचारपूस करायला हवी होती. मात्र उध्दव ठाकरे हे जखमींची विचारपूस न करता प्रचारासाठी अमरावतीला रवाना झाले.