शिवसेनेकडून ‘या’ दोन जागांमध्ये बदल तर ‘सातारा-पालघर’चा निर्णय रविवारी

मुंबई – भाजपा-शिवसेना युतीमधील भाजपाने काल महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा केल्यानंतर लगेचच आज (शुक्रवारी) शिवसेनेने आपल्या 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. शिवसेना महाराष्ट्रात 23 तर भाजप 25 जागा लढवणार आहेत. भाजपाने गुरूवारी महाराष्ट्रातील 16 जागांवरील उमेदवार घोषित केले आहेत.

पहिल्या यादीत शिवसेनेने आज 21 जागेवर उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये शिवसेनेने 19 विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली आहे. तर हिंगोली आणि उस्मानाबाद या दोन जागी बदल केला आहे. हिंगोलीत हेमंत पाटील तर उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर यांना लोकसभेचं तिकिट दिलं आहे. उस्मानाबाद मतदार संघामधून विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना डच्चू देण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी लाट असूनही काँग्रेसच्या राजीव सातव यांनी हिंमतीने निवडणूक लढवत विजय मिळविला होता. शिवसेनेचे तत्कालीन खासदार सुभाष वानखेडे हे त्यावेळी पराभूत झाले. 2014 च्या विधानसभा निवडणूकीदरम्यान सुभाष वानखेडे हे भाजपवासी झाले. हिंगोलीची जागा शिवसेनेकडे असल्यामुळे याठिकाणी हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पालघर- सातारा उमेदवारीबाबत रविवारी निर्णय..

शिवसेनेने पहिल्या यादीत 2 जागा राखून ठेवल्या आहेत. या दोन जागांमध्ये पालघर लोकसभा आणि सातारा लोकसभा या मतदारसंघाचा समावेश आहे. येथील उमेदवारांची रविवारी घोषणा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पालघर येथे शिवसेनेकडून श्रीनिवास वानगा यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे तर शिवसेनेकडून सातारा लोकसभेसाठी पुरूषोत्तम जाधव आणि भाजपचे नरेंद्र पाटील याचं नाव चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर सकाळीच नरेंद्र पाटील यांनी शिवसेना प्रमुख नरेंद्र पाटील यांची भेट घेतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)