मुळशी धरणभागात शिवसेनेला “दे धक्का’ ! पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

बावधन: जसजशा निवडणुकीच्या वातातरणाला सुरुवात होतेय, तसतसे वातावरणात पक्षाच्या कार्यकर्त्यांची मानसिकता बदल्याचे चित्र मुळशी तालुक्‍यात दिसू लागले आहे. त्याची पहिली सुरुवात मुळशी धरणभागात शिवसेनेला धक्का देत, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला.

मुळशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी सभापती महादेव कोंढरे, माजी सभापती कोमल वाशीवले, तालुक्‍याचे नेते अंकुश वाशिवले यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुळशी धरण परिसरातील तिस्करी, बार्पे-आडगाव, जांभूळ, कदम या गावातील जुन्या जाणत्या आणि निष्ठावंत शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी, महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला “दे धक्का’ करत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रा. सविता दगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

भूगाव येथील दौलत रेसिडेन्सी येथे झालेल्या प्रवेश कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सणस, सभापती कोमल साखरे, उपसभापती पांडुरंग ओझरकर, तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, भोर वेल्हा मुळशी राष्ट्रवादी अध्यक्ष सुनील चांदेरे, माजी सभापती कोमल वाशिवले, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, जिल्हा सरचिटणिस विनोद कंधारे, तालुका महिला अध्यक्षा दीपाली कोकरे, युवक अध्यक्ष निलेश पाडाळे, अंकुश वाशिवले, कार्याध्यक्ष अंकुश मोरे, आप्पासाहेब करपे, नानासाहेब मारणे, सरपंच शिल्पा सोनार, संतोष कदम, गणेश वाशिवले, नितीन ओहाळ, नाथा वाशिवले, सचिन सोनार, भरत जरांडे आदी उपस्थित होते.

प्रवेश झालेल्या शिवसैनिकांमध्ये माजी सरपंच बाळू वाशिवले, रामचंद्र खरुसे, भरत खरुसे, अशोक वाशिवले, भिमराव ओव्हाळ, राजू पाठारे, राजू ओव्हाळ, रोहिदास खेडेकर, हरी खेडेकर, अमित खरुसे, गजानन जांभुळकर, ज्ञानेश्वर लोहेकर, नंदा वाशिवले, अनंता कदम, निलम खरुसे, दत्तात्रय ढोकळे, भगवान वाशिवले, दत्ता जांभुळकर, मंगेश वाशिवले, विकास खेडेकर, प्रिया वाशिवले, हेमंत पाठारे, विशाल खरुसे, दिलीप ओहाळ, महेश वाशिवले, राजू खेडेकर, दिलीप पाठारे, गोपी खेडेकर, बंटी ओहाळ आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
359 :thumbsup: Thumbs up
47 :heart: Love
27 :joy: Joy
53 :heart_eyes: Awesome
20 :blush: Great
2 :cry: Sad
5 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)