शिवसेना हा सामाजिक हीत जपणारा पक्ष -राठोड

नगर – शिवसेना हा सामाजिक हित जपणारा पक्ष आहे. विकासकामाबरोबरच वर्षभर सामाजिक उपक्रम राबवित आहेत. नगर शहरातील जनतेचे व शिवसेनेचे नाते हे अतूट आहे. वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महागडी होत असल्याने शिवसेनेच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचा शहरातील विविध भागातील गोरगरीब रुग्णांना लाभ घेता आला. नगर शहराच्या जवळील उपनगरांत लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणी आरोग्य सेवा देण्याचे काम करीत आहे, असे प्रतिापादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

केडगावमधील भाग्योदय मंगल कार्यालयात शिवसेनेच्या वतीने रुग्णांची नेत्र तपासणी करून चष्म्यांचे व औषधांचे वाटप शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अनिल शिंदे, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, दत्ता जाधव, दीपक खैरे, प्रशांत गायकवाड, रमेश परतानी, हर्षवर्धन कोतकर, संजय लोंढे, विजय पठारे, अमोल येवले, चिंटू मोढवे, पप्पू ठुबे, मुकेश गावडे, भाऊ कांडेकर, राजेंद्र पठारे उपस्थित होते.

-Ads-

नगरसेवक अनिल शिंदे म्हणाले की,या शिबिरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होत आहे. अल्पदरात डोळ्याची तपासणी व चष्म्याचे वाटप शिवसेनेच्या माध्यमातून सुरू आहे. आगरकर मळा व केडगाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला आहे. विकासकामाबरोबर शिवसेनेने नेहमीच सामाजिक उपक्रमाला प्राधान्यक्रम दिला आहे. समाजसेवेच्या व्रतामुळे नगर शहरातील जनता शिवसेनेबरोबर आहे. यापुढील काळातही समाजाच्या हिताचे उपक्रम राबविले जाण्याचा प्रामाणिक प्रयतक्‍ करणार आहे, असे सांगितले.

शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की, नगर शहराचे केडगाव हे मोठे उपनगर असून, येथे मोठी वसाहत आहे. त्यांना मोफत आरोग्य सेवा देण्याचे काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करीत आहोत. केडगावमध्ये विविध विभागात हे शिबिर आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)