शिवसेना मेळावा; गटबाजी संदर्भात भाषणातून जिल्हाप्रमुखांची वरिष्ठांकडे तक्रार

शिवसेना मेळावा; गटबाजी संदर्भात भाषणातून जिल्हाप्रमुखांची वरिष्ठांकडे तक्रार

कोल्हापूर – गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची सीट थोड्या मतांनी हुकली. हे कोणामुळे झाले, याचा अभ्यास करण्याची गरज असून आशा लोकांचा बंदोबस्त करून त्यांच्यावर लक्ष ठेवा, अशी सूचना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना केली.सविस्तर वाचा….. https://goo.gl/x3A6Fh

Posted by Dainik Prabhat on Tuesday, 12 March 2019

कोल्हापूर – गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची सीट थोड्या मतांनी हुकली. हे कोणामुळे झाले, याचा अभ्यास करण्याची गरज असून आशा लोकांचा बंदोबस्त करून त्यांच्यावर लक्ष ठेवा, अशी सूचना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना केली.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना गट प्रमुख व बी एल ए यांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला मंत्री दिवाकर रावते संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हाप्रमुख हे उपस्थित होते. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील सर्वच पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते. पण विद्यमान आमदार राजेश क्षिरसागर आणि नूतन शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांची उपस्थिती नसल्याने सभास्थळी अनेक चर्चेला उधाण आले.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा कोल्हापूर शिवसेनेमध्ये असलेली गटबाजी पुन्हा एकदा समोर आली. आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे वेगवेगळे गट आहेत हे सर्वांना चांगलेच माहीत आहे. पण आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या गट प्रमुख व बी एल ए यांच्या मेळाव्यात सुद्धा ही गटबाजी दिसून आल्याची चर्चा सुरू होती.

दरम्यान, जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांचा मोजक्याच मतांनी पराभव झाल्याचे सांगत त्याला जबाबदार पक्षातील काही मंडळीच असल्याचे म्हंटले. पण यावेळच्या निवडणुकीत पुन्हा तसाच दगा फटका बसू नये त्यामुळे अशा लोकांना ताकीद देण्याची सूचना संजय पवार यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना कोणाचेही नाव न घेता केली. शिवाय स्थानिक स्थरावर जी काही किरकोळ वादावादी असते ती निवडणुकीवेळी बाजूला ठेवणे गरजेचे आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी साटेलोटे करून राजकारण करणाऱ्यांवर लक्ष ठेवा. वेळ आल्यावर आशा लोकांची नावे मी जाहीररित्या सांगणार असल्याचेही जिल्हाप्रमुख संजय पवारांनी म्हंटले आहे.

लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष जोमानं कामाला लागले आहेत. पक्षाकडून अजून उमेदवारी जाहीर झाली नसताना प्रत्येक पक्षाने संभाव्य उमेदवारांच्याा प्रचारार्थ मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे. यावेळी सर्वांची भाषणे झाली परंतु जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे भाषण मात्र गटबाजीच्या मुद्द्यावरून चांगलंच गाजलं.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)