मोदी, फडणवीस ‘हुकूमशहा’ : शिवसेना

नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने भाजपावर टीकेची झोड उठवली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘हुकूमशहा’ म्हणून संबोधले आहे. नरेंद्र मोदी आणि अन्य भाजपा नेत्यांचे वर्तन पाहता त्यांना ‘आणीबाणी’ वर टीका करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे  शिवसेनेने म्हंटले आहे.
ज्या प्रमाणे हिटलरने लाखो ज्यू लोकांची ‘गॅस चेम्बर’ मध्ये हत्या केली त्याचप्रकारे नाणार प्रकल्पद्वारे सरकार येथील स्थानिकांची हत्या करून त्यांच्या जमिनी उध्वस्त करणार असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केंद्रातील भाजप सरकारवर केला आहे.
सामना या पक्षाच्या मुखपत्रात छापलेल्या एका अग्रलेखातून हि टीका करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उभारण्यात येत असलेला नाणार हा प्रकल्प परिसरात कॅन्सर, टी.बी. असे भयंकर रोग घेऊन येणार असल्याचे देखील या अग्रलेखाद्वारे सांगण्यात आले आहे. पंतप्रधानांनी केंद्रातील व राज्यातील पर्यावरण मंत्रालये बंद करावीत असा सल्ला देखील या अग्रलेखात देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सडकून टीका करताना मुखमंत्र्यांनी जनतेचा विश्वासघात केला असून स्थानिकांच्या विरोधाला डावलून हा प्रकल्प उभारला जात आहे. लोकशाही मध्ये जर बहुमताचा आदर केला गेला नाही तर त्याला ‘हुकूमशाही’ म्हणूनच संबोधले जाते असे आरोप करण्यात आले आहेत .
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)