शिवसेनेकडून खासदारकी लढवणार : बबनराव घोलप

साकुर (ता. संगमनेर) येथील एका खाजगी कार्यक्रमात बबनराव घोलप यांनी हजेरी लावली यावेळी युवा सेनेचे उप तालुकाप्रमुख गुलाब भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.

संगमनेर – लोकसभा निवडणुकीत लढवण्याची संधी 2014 मध्येच शिवसेनेकडून मिळाली होती. परंतु काही अडचणींमुळे उमेदवारी रद्द झाली होती. आता पुन्हा आगामी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर खासदारकी लढवणार असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री बबनराव घोलप यांनी केले.

संगमनेर तालुक्‍यातील साकुर येथील एका कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. याप्रसंगी ते पुढे म्हणाले की, 2014 लोकसभा निवडणुकीला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मला संधी होती. परंतु काही कायदेशीर अडचणी आल्यामुळे अचानक उमेदवारी रद्द झाली. मात्र आगामी लोकसेभेला माझी परिपूर्ण तयारी आहे.

शिवसेनेच्या तिकीटावरच निवडणूक लढविणार आहे. मातोश्रीवरून तसा हिरवा कंदील देखील मला आहे. कायदेशीर अपिल निकाल 31 डिसेंबर पर्यंत लागण्याची शक्‍यता आहे. निकाल माझ्या बाजूने लागल्यानंतर मीच शिर्डी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक शिवसेनेकडून लढविणारच असल्याचे घोलप यांनी सांगितले.

घोलप यांनी आपणही शिवसेनेकडून लोकसभेसाठी तयार असल्याचे दाखवून दिल्याने खा. सदाशिव लोखंडे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल का? हाच प्रश्न निर्माण झाला आहे. खा. लोखंडे यांची उमेदवारी मागील महिन्यात शिर्डी येथील कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली होती.

मात्र लोखंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेनेतील एक गट हा नाराज आहे. संगमनेर तालुक्‍यातील पठार भागात खा. लोखंडे हे फार फिरकले नाही. त्यामुळे या ठिकाणी त्यांच्याबाबत सैनिकांमधून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.

यावेळी युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख गुलाब भोसले, शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा सहसंघटक एकनाथ खेमनर, शिवाजी बाचकर, पाटील कुदनर, बाळू झिटे, योगेश खेमनर, विक्रम सागर, माऊली इघे, संतोष वनवे, जना नागरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)