शिवराज म्हणतात, मीच सर्वांत मोठा सर्वेक्षक

मध्यप्रदेशात भाजपच्या विजयाचे भाकीत

भोपाळ: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेसमध्ये अटीतटीची लढत होण्याचा मतदानोत्तर चाचण्यांचा निष्कर्ष फेटाळून लावला आहे. मीच सर्वांत मोठा सर्वेक्षक असल्याचे म्हणत त्यांनी भाजपच्या विजयाचे भाकीत केले आहे.

-Ads-

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत शुक्रवारी मतदानोत्तर चाचण्यांनी सर्वेक्षणांच्या आधारे आपले अंदाज जाहीर केले. त्या राज्यात सत्तेसाठी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये टाईट फाईट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही चाचण्यांनी तर कॉंग्रेस पक्ष बाजी मारू शकतो, असे भाकीत केले आहे. त्याबाबत पत्रकारांनी शनिवारी दतियामध्ये शिवराज यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर ते उत्तरले, मी संपूर्ण दिवस लोकांमध्ये असतो. त्यामुळे मीच सर्वांत मोठा सर्वेक्षक आहे.

समाजातील प्रत्येक घटकाचा आशीर्वाद आम्हाला निवडणुकीत मिळाला. त्यामुळे निवडणुकीत विजय मिळवून भाजप मध्यप्रदेशात सलग चौथ्यांदा सरकार स्थापन करेल. अब की बार, 200 पार या भाजपने निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलेल्या नाऱ्याचाही त्यांनी पुनरूच्चार केला. मध्यप्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. त्यातील 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने समोर ठेवले आहे. आता 11 डिसेंबरला जाहीर होणाऱ्या निकालाबाबत उत्सुकता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)