शिवपाल यादव करणार कॉंग्रेसशी हातमिळवणी

बरेली: उत्तरप्रदेशात कॉंग्रेस पक्षाशी हातमिळवणी करण्याची तयारी मुलामयसिंह यादव यांचे बंधु शिवपाल यादव यांनी दर्शवली आहे. त्यांनी अलिकडेच प्रगतीशील समाजवादी पार्टी नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. त्यांनी म्हटले आहे की उत्तरप्रदेशातील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये आमच्या शाखा असून तेथे आमची राजकीय ताकद आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आमची या राज्यात कॉंग्रेस पक्षाशी युती करण्याची तयारी आहे.

भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी जो कोणी नव्याने आघाडी स्थापन करून एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची इच्छा व्यक्त करील अशा कोणत्याही पक्षाने आपल्याशी चर्चा करावी आपण त्यासाठी तयार आहोत असे त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उत्तरप्रदेशात सध्या राम जन्म भूमिचा प्रश्‍न तापला आहे त्या विषयी विचारले असता ते म्हणाले की वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याचा आग्रह धरणे योग्य नाही. शरयु नदीच्या तिरावर अनेक ठिकाणी मोकळ्या जागा आहेत त्यापैकी एका जागेवर राम मंदिर बांधले जावे. त्यासाठी आपणही व्यक्तीगत पातळीवर मदत करू असे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. हनुमानाच्या जातीवरून सध्या मोठे वादंग सुरू आहे त्या विषयी विचारले असता ते म्हणाले की हनुमान हे देव होते आणि त्यांच्या देवत्वाविषयी असल्या भलत्या शंका उपस्थित करून वादंग माजवणे योग्य नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)