शिवपाल यादव यांनी जाहीर केले 31 उमेदवार 

लखनौ – मुलायमसिंह यादव यांचे बंधु शिवपाल यादव यांनी आपल्या प्रगतीशील समाजवादी पार्टी या पक्षाच्या 31 उमेदवारांची यादी आज जाहीर केली. त्यात त्यांनी स्वत:चीही उमेदवारी जाहीर केली असून ते फिरोजाबाद मतदार संघातून आपलेच पुतणे अक्षय यादव यांच्या विरोधात लढणार आहेत. अक्षय यादव हे त्या मतदार संघातील समाजवादी पक्षाचे विद्यमान खासदारहीं आहेत.ते राम गोपाल यादव यांचे चिरंजीव आहेत.

शिवपाल यादव यांनी आज पत्रकार परिषदेत पीस पार्टी आणि अपना दल या पक्षांशी आघाडीही जाहीर केली. भाजपच्या राज्यात शेतकऱ्यांचे दलितांचे आणि अल्पसंख्याकांचे अतोनात नुकसान झाले आहे असा आरोपही त्यांनी केला. स्वत: शिवपाल यादव हे जसंवत नगर मतदार संघातील आमदार आहेत आणि या मतदार संघाचा फिरोजाबाद मतदार संघावर प्रभाव आहे त्याचा आपल्याला लाभ होईल असे त्यांनी यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)