गादेकर शिवछत्रपती राज्य क्रीडा संघटक पुरस्काराने सन्मानित

क्रीडा आयुक्‍त डॉ. भापकर यांच्या हस्ते पुण्यात गौरव

सोलापूर – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा संघटक पुरस्काराने महेश गादेकर यांना सन्मानित करण्यात आले. राज्याचे क्रीडा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात जाऊन शुक्रवारी महेश गादेकर यांनी शिवछत्रपती पुरस्कार स्विकारला . एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. क्रीडा विभागाचे सहसंचालक नरेंद्र सोपल, उपसचिव राजेंद्र पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महेश गादेकर हे उत्तम क्रीडा संघटक आहेत. सोलापूरच्या क्रीडा क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे . सोलापुरात राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धा भरवून त्यांनी सोलापूरचे नाव देशभरात पोहोचवले. याशिवाय अनेक खेळाडूंना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या मदत करण्याबरोबरच खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी पार पडले आहे. त्यांच्या या क्रिडा क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन राज्य शासनाने गादेकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा संघटक पुरस्कार जाहीर केला होता .

रविवार 17 फेब्रुवारी रोजी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या शानदार सोहळयात राज्यभरातील खेळाडू, मार्गदर्शक आणि संघटकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मात्र वैयक्तिक अडचणीमुळे महेश गादेकर या कार्यक्रमाला जाऊ शकले नव्हते. परंतु शुक्रवार 22 फेब्रुवारी रोजी त्यांनी पुण्यात बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात जाऊन क्रीडा आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)