शिवाजीनगर बस स्थानक वाकडेवाडीला स्थलांतरित होणार

पुणे : मेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर येथील एस.टी. स्थानकाची जागा तीन वर्षे करारावर भाड्याने देण्यात येणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर एस. टी. स्थानक हे वाकडेवाडी येथील दुग्धव्यवसाय विभागाच्या जागेवर स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे. राज्याच्या कृषी ,पशूसंवर्धन,दुग्धविकास व मत्सव्यवसाय विभागाच्या वतीने हा अध्यादेश काढण्यात आला आहे.

मात्र,आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतरच एस.टी.स्थानकाचे स्थलांतर केले जाईल. काही अटी व शर्तीच्या अधिन राहून दुग्धविकास विभागाने ही जागा भाडेकरारावर देण्याचे निर्णय घेतले असून , या जागेवर इतर कोणासही हस्तांतरण,फेरवाटप करता येणार नाही.मात्र या जमिनीवर, व्यक्ती किंवा संस्था,कंपनीला जमिनीच्या कोणत्याही भागावर हक्क निर्माण होतील,अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार करता येणार नाही.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)