शिवाजी विद्यापीठाची जिल्हास्तरीय एक दिवसीय “आविष्कार’ कार्यशाळा उत्साहात

वाई – कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्यावतीने किसनवीर महाविद्यालयात सातारा जिल्हास्तरीय “आविष्कार’ संशोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ÷ऊद्‌घाटन डॉ. ए. एम. गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. जे. एस. चौधरी होते.

डॉ. ए. एम. गुरव यांनी , आविष्कार या स्पर्धेकडे विद्यार्थ्यांनी सुसंधी म्हणून पहावे, आपल्यातील संशोधक वृत्तीची जोपासना करावी, स्वतःला एक ब्रॅंड म्हणून विकसीत करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
शिक्षणशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. व्ही. एस. खंडागळे यांनी संशोधन कसे असावे, संशोधनाची प्रक्रिया कशी असावी याबाबत विवेचन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. जे. एस. चौधरी यांनी, भारतातील संशोधनाची गुणवत्ता अजूनही सुधारली पाहिजे व आविष्कार चा उद्देश हाच असून जास्तीत जास्त महाविद्यालयांनी या प्रशिक्षणाचा व स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. प्रास्तविक प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले यांनी , प्रा. रविंद्र बकरे यांनी परिचय तर डॉ. ज्ञानदेव झांबरे यांनी आभार मानले. सूत्रसंचलन डॉ चंद्रकांत कांबळे व सौ. शुभांगी सुपेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)